फक्त १ रुपयात मिळवा पिक विमा व पिक विमा बद्दल सविस्थर माहिती – Pik Vima Yojna

Pik Vima Yojana – महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची माहिती प्रधान मंत्री पिक विमा योजना 2023 या वर्षासाठी आता शेतकऱ्यांना आता केवळ  रुपयांत पिक विमा मिळणार आहे. याची उर्वरित रक्कम आता राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प २०२३ मध्ये केली.

Pik Vima Yojana – प्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 करिता राज्यात राबविणे बाबत. महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मस्त्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्र.प्रपीवियो-२०२३/प्र/क्र/५२/११-अ सदर चा शासन निर्णय महारष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेस्थळावर उपलब्ध आहे.

शासन निर्णय बघण्यासाठी येते क्लिक करा.

Pik Vima Yojana – प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. सदरची योजना खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022-23 करिता Cup & Cap Model (80:110) नुसार राबविण्यात आली आहे. केंद्र शासनाने संदर्भ क्र.4 अन्वये Cup & Cap Model (80:110), Cup & Cap Model (60:130) Profit & Loss Sharing Model यापैकी एका मॉडेलनुसार योजनेची अंमलबजािणी करणेकरीता मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 हंगामासाठी तीन वर्षाकरिता राज्यात राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

योजनेत समाविष्ट पिके व शेतकरी :- Pik Vima Yojana 

Pik Vima Yojana – या योजने अंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण मिळेल. सदर योजना
राज्यात शासनाने खरीप व रब्बी हंगामासाठी अधिसूचित केलेल्या महसुल मंडळ/मंडळगट तालुकास्थरावर  खालील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येईल.

पिक वर्गवारी

खरीप हंगाम रब्बी हंगाम

तृणधान्य व काडधान्य पिके

भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मुग, उडीद, तूर, मक्का (८)

गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात. (४)

गळीत धान्य पिके

भुईमुग, कारळे, तीळ, सूर्यफुल, सोयाबीन (५)

उन्हाळी भुईमुग, (१)

नगदी पिके कापूस, खरीप कांदा.(२)

रब्बी कांदा (१)

 

Pik Vima Yojana – पिकनिहाय विमा हप्ता दर व विमा हप्ता अनुदान :-

या योजने अंतर्गत विमा हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारण्यात येईल. तथापि, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांसाठी खरीप व रब्बी हंगामासाठी प्रती हेक्टरी विमा हप्ता दर खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

पिके शेतकरी हिस्सा विमा हप्ता

खरीप हंगाम

रब्बी हंगाम

1 अन्यधान्य व गळीत धान्य पिके विमा संरक्षित रक्कमेच्या २ टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापेकी जे कमी असेल ते

विमा संरक्षित रक्कमेच्या १.५ टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापेकी जे कमी असेल ते

नगदी पिके (कापूस व कांदा) विमा संरक्षित रक्कमेच्या ५ टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापेकी जे कमी असेल ते

विमा संरक्षित रक्कमेच्या ५ टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापेकी जे कमी असेल ते

 

Pik Vima Yojana – तथापि, सन 2023-24 पासून सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय संदर्भ. ६  अन्वये घेण्यात आलेला असून शेतक-यांना प्रती अर्ज केवळ 1/- रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. या योजनेअंतर्गत निश्चित करण्यात  करण्यात आलेला पीकनिहाय प्रती हेक्टरी विमा हप्ता व शेतक-यांनी प्रत्सयक्षात भरावयाचा विमा हप्ता रक्कम रू.1/-वजा जाता उर्वरित फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान (Rate of normal premium subsidy) समजून राज्य शासनामार्फत अदा करण्यात येईल. तसेच विमा हप्ता अनुदानाच्या केंद्र हिस्स्याला नवीन सुधारणानुसार मर्यादा आल्या आहेत. योजनेच्या केंद्र शासनाच्या प्रचलित मार्गदर्शक सुचनेनूसार ई-निविदेद्वारे प्राप्त न्यूनतम विमा हप्ता दरातील शेतकरी हिस्सा वजा जाता उर्ररित रक्कम ही राज्य व केंद्र शासनामार्फत समप्रमाणात विमा कंपनीस दिली जात होती. तथापि, केंद्र शासनाच्या दिनांक 17 ऑगस्, 2020 रोजीच्या सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार, विमा हप्ता अनुदानाच्या केंद्र हिस्स्याला मर्यादा लागू राहतील. केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सुचनेनूसार केंद्र शासन कोरडवाहू जिल्ह्यातील पिकांना 30 टक्के व  बागायती जिल्ह्यातील पिकांना 25 टक्केच्या मयादेत त्याचा समप्रमाणातील हिस्सा अदा करणार आहे.

अ.क्र. समाविष्ट जिल्हे नियुक्त केलेली विमा कंपनी
1 अहमदनगर, नाशिक,चंद्रपूर ओरिएन्टल इंन्शुरन्स कं.लि.
2 सोलापूर, जळगाव, सातारा ओरिएन्टल इंन्शुरन्स कं.लि.
3 परभणी, वर्धा, नागपूर आय.सी.आय.सी.आय लोबार्ड जनरल इंन्शुरन्स कं.लि.
4 जालना, गोंदिया, कोल्हापूर युनिव्हर्सल सोम्पो जनरल इंन्शुरन्स कं. लि.
5 नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुरुर्ग युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कं. लि.
6 औरंगाबाद, भंडारा,
पालघर, रायगड
चोलामंडलम एम एस जनरल इंन्शुरन्स कं. लि.
7 वाशीम, बुलढाणा, सांगली,
नंदुरबार
भारतीय कृषी विमा कंपनी
8 हिंगोली, अकोला, धुळे, पुणे एच.डी.एफ.सी इग्रो जनरल इंन्शुरन्स कं.लि.
9 यवतमाळ, अमरावती,
गडचिरोली
रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं. लि.
10 उस्मानाबाद  एच.डी.एफ.सी इग्रो जनरल इंन्शुरन्स कं.लि.
11 लातुर एसबीआय जनरल इंन्शुरन्स कं.लि.
12 बीड भारतीय कृषी विमा कंपनी

 

Pik Vima Yojana – योजनेचे वेळापत्रक :-

  • खरीप
    • प्रथम वर्ष :- ३१ जुलै २०२३
    • द्वितीय वर्ष :- १५ जुलै २०२४
    • तृतीय वर्ष :- १५ जुलै २०२५
  • रब्बी
    • ज्वारी बाजरी :- ३० नोव्हेंबर
    • गहू बा. हरभरा, कांदा, व इतर पिके :- १५ डिसेंबर
    • उन्हाळी भात, उन्हाळी भुईमुग :- ३१ मार्च

MAHA-DBT वर शेतकरी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा..

वरील  लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.

आमच्या सोशल मिडिया ग्रुप ला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

error: Content is protected !!