MAHA JYOTI – महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि इंटरनेट साठी असा करा अर्ज – MAHA JYOTI Free Tab and Internet Online Application –

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती-विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून MHT-CET / JEE / NEET – 2025 करिता पूर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मार्फत MHT-CET / JEE / NEET परीक्षा  पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB / Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.

MAHA JYOTI योजनेच्या लाभासाठी पात्रता :

  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा / असावी.
  2. उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती – भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापेकी असावा / असावी.
  3. उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा / असावी.
  4. जे विद्यार्थी सन – २०२३ मध्ये १० वी ची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थिनी अर्ज करताना १० वी चे प्रवेश पत्र व ९ वी ची गुणपत्रिका जोडावी.
  5. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक आहे.

MAHA-DBT विद्यार्थी शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.

MAHA JYOTI अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  1. ९ वी ची गुणपत्रिका
  2. १० वी परीक्षेचे ओळखपत्र
  3. आधार कार्ड
  4. रहिवासी दाखला
  5. जातीचे प्रमाणपत्र
  6. वैध नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र

MAHA JYOTI अटी व शर्ती :

  1. अर्ज करण्याचा अंतिम दि. ३१/०३/२०२३ आहे.
  2. पोस्टाने किंवा ई-मेल  द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
  4. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Center वर संपर्क करावा : संपर्क क्र – 0712-2870120/21  Email Id : mahajyotijeeneet24@gmail.com
  5. 10 वी चा निकाल लागल्यावर विद्यार्थ्याकडून १० वी ची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईत सर्टिफिकेट) व MHT – CET / JEE / NEET या परीक्षेची तयारी करत आहेत असे हमीपत्र मागविण्यात येतील.

तलाठी चा फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.

MAHA JYOTI अर्ज कसा करावा :

  1. महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for MHT-CET/JEE/NEET – 2025 Training” यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  2. अर्जासोबत नमूद कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ठ दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे.

MAHA JYOTI Application for MHT-CET/JEE/NEET – 2025 Training

MAHA JYOTI महाज्योती तर्फे JEE/NEET/MHT-CET 2025 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना टॅब व प्रशिक्षण देण्याकरिता नोंदणी अर्ज मागविण्यात येत आहेत. परंतु अर्ज करताना काही विद्यार्थ्यांजवळ नॉन क्रिमीलेअर, जात प्रमाणपत्र व रहिवासी दाखला नसल्यामुळे अर्ज भरतांना अडचणी येत आहेत असे काही विद्यार्थ्यांनी महाज्योतीला कळविले आहे. त्या करिता विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दहावीची गुणपत्रिका ज्यावेळेस मागविण्यात येईल तेव्हा विद्यार्थ्यांनी जाती प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर व अधिवास प्रमाणपत्र अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी सगळ्या विद्यार्थ्यांनी 15 मे 2023 त्यापूर्वी जाती प्रमाणपत्र, डोमेसाईल व जात प्रमाणपत्र तयार करावी.

MAHA JYOTI सद्यस्थितीत खालील कागदपत्रां आधारे अर्ज करता येईल:

  • फोटो
  • स्वाक्षरी
  • आधार कार्ड
  • ९वी ची गुणपत्रिका
  • १० वी बोर्ड परीक्षेचं प्रवेशपत्र

MAHA JYOTI काही महत्वाच्या लिंक 

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.

आमच्या सोशल मिडिया ग्रुप ला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

error: Content is protected !!