MAHA-DBT विद्यार्थी शिष्यवृत्ती माहिती – MAHA-DBT Student Scholarship Information

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती योजनांची सुरुवात करत असते. जेणेकरून राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या सहाय्याने स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने MAHA-DBT Student Scholarship Portal सुरु केले आहे, या पोर्टल मध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध विभागांद्वारे सुरु करण्यात आलेल्या अनेक शिष्यवृत्तीचा समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या MAHA-DBT Student Scholarship Portal वर जाऊन सर्व विभागातील शिष्यवृत्तीची माहिती मिळवू शकतील तसेच अर्ज करून लाभ मिळवू शकतील.

MAHA-DBT पोर्टल नवीन शेतकरी नोंदणी प्रक्रिया

MAHA-DBT Scholarship in Marathi

राज्यातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत त्यांच्या जवळ कायम स्वरूपाचा रोजगार नसल्याकारणामुळे त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. दिवसेंदिवस शिक्षणाच्या खर्चात होणारी वाढ महाविद्यालयाची फी, ट्युशन फी व इतर शालेपयोगी वास्तूचे वाढणारे भाव त्यामुळे ते आपल्या मुलांना शिक्षण देण्यास असमर्थ असतात त्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहतात. काही कुटुंब मुलांच्या  शिक्षणासाठी जास्त व्याज दराने कर्ज घेतात व कर्ज परत फेडू करून शकल्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे त्याचा सामाजिक विकास होत नाही व भविष्यात त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध न झाल्यामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्यातील अनेक विभागांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे शिष्यवृत्ती सुरु केल्या. परंतु विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी सुरु करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीची माहिती मिळत नव्हती त्यामुळे ते शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू न शकल्यामुळे आपले शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहत होते. महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या या समस्यांचा विचार करून MAHA DBT Student Scholarship सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला

MAHA DBT Student Scholarship हे महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेले एक ऑनलाईन पोर्टल आहे जिथे इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी (पोस्ट मॅट्रिक) त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी त्यांच्या विभागाद्वारे अर्ज करू शकतात.

महाडीबीटी पोर्टल चा उद्देश

MAHA DBT Student Scholarship

  • राज्यातील शिष्यवृत्तीची प्रभावी अंमलबजावणी आणि वितरण सुनिश्चित करणे हे MAHA DBT Student Scholarship चे मुख्य उद्दिष्ट्य आहे.
  • विद्यार्थ्यांना एकाच पोर्टल वर राज्यातील सर्व विभागांद्वारे सुरु करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीचा लाभ घेता यावा या उद्देशाने MAHA DBT Student Scholarship Portal ची सुरुवात करण्यात आली आहे.
  • महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची कार्यश्रम अंमल बजावणी आणि वितरण सक्षम करणे हे Maha DBT  चे उद्दिष्ट्य आहे.

पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्ती

Social Justice and Special Assistance Department – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

  • भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
  • मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क
  • व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
  • शालांत परिक्षोत्तर(मेट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना
  • अनुसुचित जाती प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना

Tribal Development Department – आदिवासी विकास विभाग

  • भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना
  • अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने
  • व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने
  • व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता निर्वाह भत्ता
  • अनुसुचित जमाती प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना

Directorate of Higher Education – उच्च शिक्षण संचालनालय

  • राजर्षीछत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
  • गुणवान विद्यार्थांना आर्थिक सहाय्य – कनिष्ठ पातळी
  • माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य
  • एकलव्य आर्थिक सहाय्य
  • राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
  • गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती
  • शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती
  • राज्य शासनाची दक्षिणा अधिधात्रवृत्ती
  • शासकीय संशोधन अधिधात्रवृत्ती
  • स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य
  • जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती
  • गुणवान विद्यार्थांना आर्थिक सहाय्य – वरिष्ठ पातळी
  • डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

Directorate of Technical Education – तंत्रशिक्षण संचालनालय

  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना(ईबीसी)
  • डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

MAHA DBT Student Portal वर विद्यार्थी  लॉगीन करण्यासाठी येथे क्लिक करा.

School Education and Sports Department – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

  • कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती
  • आर्थिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती

OBC, SEBC, VJNT & SBC Welfare Department – OBC, SEBC, VJNT आणि SBC कल्याण विभाग

  • विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
  • विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदाने
  • व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना
  • इयत्ता १० वी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या व १२ वी मध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती
  • इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
  • विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
  • इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदाने
  • विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदाने
  • विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना

Directorate of Medical Education and Research – वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय

  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना
  • डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
  • वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील एसईबीसी आणि ईडब्ल्युएस आरक्षणामुळे बाधित खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिक्षण शुल्काची प्रतिपुर्ती

MAHA DBT Student Portal वर नवीन विद्यार्थी नोदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Minority Development Department – अल्पसंख्याक विकास विभाग

  • राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती (भाग – २)
  • उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना
  • अल्पसंख्याक शिष्यवृत्ती

Directorate of Art – कला संचालनालय

  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना(ईबीसी)
  • डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

Skill Development, Employment And Entrepreneurship Department – कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग

  • सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आणि खुल्या प्रवर्गातील (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना.

पात्र योजना शोधा

वय – पोस्ट-मॅट्रिक उमेदवार महाडीबीटी योजनांतर्गत अर्ज करण्यास सक्षम असतील

पात्रता – महाडीबीटी पोर्टल अंतर्गत पोस्ट मेट्रिक शिष्यवृत्ती योजना अस्तित्वात आहे

पत्ता – महाडीबीटी पोर्टल योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहेत

MAHA DBT Student Scholarship Portal वर विद्यार्थी पात्र योजना शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या सोशल मिडिया ग्रुप ला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!