महाराष्ट्र शासनाचे आपले सरकार DBT Portal (Direct Benefit Transfer Portal) हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाकांक्षी उपक्रम असून, सामान्य नागरिकांना योजनांच्या माध्यमातून थेट लाभ मिळवून देण्यासाठी उभारलेले एक ऑनलाईन व्यासपीठ आहे.
राज्य MAHA DBT आणि सेवा पोर्टलचे मुख्य पृष्ठ विकसित करणे आणि विविध शासकीय योजनांच्या सेवा पुरवणे हे आपले सरकार MAHA DBT चे मुख्य उद्दिष्ट आहे. सदर लेख मध्ये महाडी-बीटी या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी कशी केली जाते याबाबत माहिती पाहणार आहोत. ही एक एकदा करण्याची प्रक्रिया आहे. त्यानंतर, पोर्टलवरील विविध सरकारी योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
आपले सरकार MAHA DBT ची मुख्य वैशिष्ट्ये :
- महाराष्ट्रातील शेतकरी कोणत्याही वेळी, कुठूनही आपले सरकार DBT च्या पोर्टलवरून नोंदणी करून राज्य आणि केंद्र पुरस्कृत कृषी योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- शेतकरी त्यांनी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती त्यांच्या वापरकर्ता आयडी (User Name) वापरून कधीही पाहू शकतात.
- सुलभ पडताळणी आणि पारदर्शकता यासाठी ७/१२ प्रमाणपत्र, ८ अ प्रमाणपत्र, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकची प्रत, खरेदीच्या पावतीची प्रत, इ. ऑनलाईन अपलोड करू शकतात.
- आपले सरकार DBT च्या अर्ज प्रक्रियेच्या विविध स्तरांवर अर्जदारांना एसएमएस आणि ईमेल अलर्टची सुविधा आहे.
- नोंदणीकृत अर्जदार/ शेतकरी यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ वितरण केले जाते.
- मंजूरी प्राधिकरणासाठी अर्ज मंजुरीची सुलभ प्रक्रिया.
- युनिक वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड उपलब्ध.
- विभाग / राज्य प्राधिकरण यांच्याद्वारे कृषी योजना अर्जांच्या देखेरेखीची पारदर्शकता.
MAHA DBT Farmer पोर्टल नवीन नोंदणी/ MAHA-DBT Farmer New Registration :
अर्जदार ऑनलाईन नोंदणीद्वारे स्वतः नोंदणी करू शकतात. आपले सरकार DBT पोर्टलवर नोंदणी/Registration करण्यासाठी सर्वप्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
MAHA DBT Farmer Portal
- नवीन नोंदणीसाठी ‘New Applicant Registration‘ बटणवर क्लिक करा.
- ‘Registration Type’ मध्ये नोंदणी प्रकार निवडा. (वैयक्तिक किंवा शेतकरी गट).
- आधारकार्ड आहे किंवा नाही ते निवडून ‘Yes’ पर्याय निवडून ‘Continue’ बटणवर क्लिक करा.
- ‘OTP’ द्वारे तुमचा तुमचा मोबाईल क्रमांक ‘Verify’ करा.
- OTP यशस्वीपणे तपासणी झाल्यावर अर्जदाराची वैयक्तिक माहिती, पत्ता, बँक तपशील इत्यादी प्रसिद्ध होईल. तपशील मध्ये काही बदल असल्यास अर्जदाराने UIDAI किंवा जवळच्या आधार नोंदणी केंद्राशी संपर्क साधा. त्यानंतर, अर्जदाराचे वापरकर्ता नाव आणि पासवर्ड (User Name & Password) तयार करावा लागतो.
MAHA-DBT Farmer Registration वापरकर्ता नाव (User Name) – सूचना :
- अर्जदाराने वापरकर्ता नाव असे निवडावे कि जे याअगोदर प्रणालीमध्ये वापरलेले नाही.
- वापरकर्ता नावामध्ये (User Name) केवळ अक्षरे आणि संख्या असाव्यात आणि कमीत कमी ४ व जास्तीत जास्त १५ वर्ण असावेत.
- अर्जदाराने वापरकर्ता नाव आणि पासवर्ड आणि संकेतशब्द (पासवर्ड) पुष्टी प्रविष्ट करा.
- अर्जदाराने आपला वैयक्तिक वैध मोबाईल क्रमांक प्रविष्ट करावा. अर्जदाराची ओळख पटवण्यासाठी ही पायरी अनिवार्य आहे.
- अर्जदाराने मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून ‘Get OTP for Mobile Number Verification’ या बटनवर क्लिक करा.
- अर्जदाराने प्राप्त OTP दिलेल्या मजकूर बॉक्समध्ये प्रविष्ट करून ‘Verify OTP for Mobile Number’ बटन वर क्लिक करावे. प्राप्त OTP केवळ ३० मिनिटांसाठी वैध असेल. अर्जदार नोंदणीकृत यूजर आयडी व पासवर्ड वापरून आपले सरकार डीबीटी पोर्टलवर लॉगइन करू शकतात.
६. त्यानंतर, अर्जदाराने प्रोफाइल तपशील भरण्यासाठी ‘Profile’ बटन वर क्लीक करा. त्यामध्ये, वैयक्तिक तपशिल, कुटुंब तपशिल, अधिवास तपशील, पात्रता तपशील, जातीचा तपशील, जमीन तपशील, पीक तपशील,सिंचन स्रोत, इत्यादी माहिती भरावी.
MAHA-DBT वैयक्तिक माहिती:
अर्जदाराने या फॉर्ममधील सर्व फिल्ड भरणे अनिवार्य आहे. वैयक्तिक माहितीमध्ये नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्म तारीख, वय, लिंग, पाहिले नाव, मधले नाव, आडनाव पॅन क्रमांक इत्यादी माहिती भरावी.
MAHA-DBT जात तपशील :
अर्जदारांनी या फॉर्ममधील सर्व फिल्ड भरणे अनिवार्य आहे. यामध्ये, जातीचा वर्ग, जात, उपजात, जात प्रमाणपत्र आहे का ? असल्यास, बारकोड नमूद आहे का ? जात प्रमाणपत्र क्रमांक.
MAHA-DBT वैयक्तिक अपंगत्व तपशील :
अर्जदारांनी या फॉर्ममधील सर्व फिल्ड भरणे अनिवार्य आहे यामध्ये, कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आहे/नाही ? असल्यास, अपंगत्वाचा प्रकार, विकलांग व्यक्ती प्रकार निवडा, व आपल्याकडे अक्षमता प्रमाणपत्र आहे का ? असल्यास होय किवा नाही वर टिक करा.
IBIL Score चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.
MAHA-DBT बँक तपशील :
टीप: आपला आधार क्रमांकाशी जोडलेला बँक खाते क्रमांक हा अंतिम बँक खाते क्रमांक आहे ज्याच्याशी आपण आपला आधार क्रमांक यशस्वीरित्या जोडला आहे.
तुमचे आधार-जोडलेले बँक खाते एक जन धन / युवक खाते आहे का किंवा खात्यातून पैसे काढण्याची किंवा ठेवण्याची मर्यादा आहे का ? असल्यास होय किवा नाही वर टिक करा.
MAHA-DBT उत्पन्न तपशील:
अर्जदारांनी या फॉर्ममधील सर्व फिल्ड भरणे अनिवार्य आहे. ७/१२ तपशील सर्वेक्षण क्रमांक – अर्जदाराने सर्वेक्षण क्रमांक प्रविष्ट करावा.
वैयक्तिक मालकी (हेक्टर आणि आर) – अर्जदाराने वैयक्तिक जमिनी मालकी असलेले हेक्टर आणि आर मधील एकूण क्षेत्र प्रविष्ट करावे.
संयुक्त मालकी (हेक्टर आणि आर) – अर्जदाराने संयुक्त जमीन मालकी असलेले हेक्टर आणि आर मधील संयुक्त क्षेत्र प्रविष्ट करावे. जर मालमत्तेचा मालकी हक्क एकापेक्षा जास्त व्यक्तींकडे असेल तर त्याला संयुक्त मालकी असे म्हणतात.
MAHA DBT Portal New Farmer Registration Process – महा-डीबीटी पोर्टल नवीन शेतकरी नोंदणी प्रक्रिया
सामान्य मालकी (हेक्टर आणि आर) – अर्जदाराने सामान्य जमीन मालकी असलेले हेक्टर आणि आर मधील एकूण क्षेत्र प्रविष्ट करावे. सामान्य जमीन ही बहुसंख्य व्यक्तींच्या एकत्रितपणे मालकीची असते.
What is a CIBIL Score ? – CIBIL स्कोर म्हणजे काय ?
आपल्या मालकीच्या अंतर्गत एकूण क्षेत्र – हे फील्ड अक्षम केलेले आहे आणि एकूण वैयक्तिक, संयुक्त आणि सामान्य मालकीची गणना केल्यानंतर येणारी एकूण संख्या प्रदर्शित केली जाईल.
MAHA-DBT ७/१२ प्रमाणपत्र दस्तऐवज (शेत जमिनीचा तपशील):
आपल्या मालकीची शेतजमीन एका पेक्षा जास्त गावात असल्यास प्रत्येक गावातील शेत जमिनीची माहिती सर्व्हे नंबर निहाय भरावी.
– अर्जदाराने ७/१२ प्रमाणपत्र दस्तऐवज अपलोड करावे.
– भूमीचे विवरण जतन करा: जमिनीशी संबंधित माहिती प्रविष्ट केल्यांनतर, अर्जदाराने डेटा जतन करण्यासाठी ‘जमिनीचा तपशील जतन करा’ या बटण वर क्लिक करावे.
वर दिलेल्या माहिती च्या आधार शेतकऱ्याची MAHA DBT Farmer Portal वरील शेतकऱ्याची संपूर्ण फ्रोफाईल १००% पूर्ण भरण होईल. व त्यानंतर वेळ वेल्या योजने साठी Aplay करता येईल.
आमच्या सोशल मिडिया ग्रुप ला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.