औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मध्ये प्रवेश घेणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. विशेषतः जे विद्यार्थी दहावी/बारावी नंतर तत्काळ कौशल्य आधारित शिक्षण घेऊन नोकरी करू इच्छितात, त्यांच्यासाठी ITI हा उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला ITI प्रवेश 2025 मध्ये भाग घ्यायचा असेल, तर ही लेखनमाला खास तुमच्यासाठी आहे.
🔹 ITI म्हणजे काय ?
ITI (Industrial Training Institute) ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक तांत्रिक शिक्षण संस्था आहे. येथे विविध ट्रेड्स (उदा. इलेक्ट्रिशियन, फिटर, वायरमन, COPA, वेल्डर इ.) मध्ये प्रशिक्षण दिलं जातं. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
📅 ITI प्रवेश 2025 – महत्त्वाच्या तारखा (अनुमानित)
| प्रवेश प्रक्रियेचा तपशील | प्रारंभ दिनांक |
|---|---|
| ऑनलाइन नोंदणी सुरू | 15 मे 2025 |
| ITI मध्ये मूळ कागदपत्राची तपासणी व प्रवेश निश्चित करणे | 15 मे 2025 |
| प्रवेश साठी ट्रेड निवडणे | 26 मे 2025 |
| प्रवेश प्रक्रिया | Notification PDF |
📝 ITI प्रवेशासाठी आवश्यक पात्रता
-
शैक्षणिक पात्रता :- किमान दहावी उत्तीर्ण (SSC Pass) असणे गरजेचे आहे. काही ट्रेडसाठी आठवी पास विद्यार्थीही पात्र असतात.
-
वय मर्यादा :- किमान वय 14 वर्षे, कमाल वयाची मर्यादा नसते.
-
नागरिकत्व :- अर्जदार भारताचा नागरिक असावा.
-
काही विशेष आरक्षण :- अनुसूचित जाती, जमाती, OBC, EWS, दिव्यांग व महिला उमेदवारांना आरक्षण दिलं जातं.
💻 ITI प्रवेश 2025 साठी अर्ज प्रक्रिया (Step-by-Step)
🔸 Step 1: अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करा
ITI प्रवेशासाठी सर्वप्रथम https://admission.dvet.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावे.
-
नवीन नोंदणी (New Registration) वर क्लिक करा.
-
तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल, पासवर्ड नोंदवा.
-
मोबाईलवर OTP येईल, तो भरून खातं सक्रिय करा.
🔸 Step 2: लॉगिन करा आणि अर्ज भरा
-
वेबसाईटवर Candidate Login करा.
-
“Apply Online for ITI 2025” या लिंकवर क्लिक करा.
-
वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, आरक्षण माहिती भरून घ्या.
-
हवे असल्यास जास्तीत जास्त 10 पर्याय (प्राथमिकता अनुसार ट्रेड्स व कॉलेजेस) निवडा.
🔸 Step 3: आवश्यक कागदपत्रे…
| कागदपत्रे | तपशील |
|---|---|
| जन्माचा दाखला | 10 वी मार्कशीट / जन्म प्रमाणपत्र |
| 10वी किंवा 8वीची गुणपत्रिका | स्कॅन कॉपी |
| जात प्रमाणपत्र (लागल्यास) | Valid प्रमाणपत्र |
| अधिवास प्रमाणपत्र | महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा पुरावा |
व इत्यादी कागदपत्रे..
🔸 Step 4: अर्जाची फी भरा
-
राखीव प्रवर्ग (Reserved Category) ₹100
-
SC/ST/महिला/दिव्यांग: ₹0 ते ₹50 (काही वेळा माफ केली जाते)
पेमेंट गेटवे वापरून Net Banking, UPI, Debit/Credit Card ने पेमेंट करा.
🔸 Step 5: अर्ज सबमिट करा व प्रिंट घ्या
-
संपूर्ण माहिती पुन्हा तपासा.
-
एकदा अर्ज सबमिट केल्यावर दुरुस्ती करता येत नाही.
-
PDF स्वरूपात अर्जाची प्रत डाऊनलोड व प्रिंट करून ठेवा.
📋 ITI गुणवत्ता यादी (Merit List) व प्रवेश प्रक्रिया
-
अर्ज समाप्त झाल्यावर विभागाकडून गुणवत्तेनुसार यादी (Merit List) जाहीर केली जाते.
-
यादीमध्ये नाव आल्यास, कॉलेज रिपोर्टिंगसाठी सूचना SMS/E-mail द्वारे मिळेल.
-
तुम्ही दिलेल्या पर्यायांनुसार कॉलेज व ट्रेड वाटप होईल.
-
कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा.
Search Candidate Status
🛠️ ITI मध्ये कोणते ट्रेड्स उपलब्ध असतात? (Top ITI Courses)
| ट्रेडचे नाव | कालावधी |
|---|---|
| Electrician | 2 वर्षे |
| Fitter | 2 वर्षे |
| COPA (Computer Operator) | 1 वर्ष |
| Welder | 1 वर्ष |
| Diesel Mechanic | 1 वर्ष |
| Wireman | 2 वर्षे |
| Turner | 2 वर्षे |
| Plumber | 1 वर्ष |
SEARCH ITI AND TRADE
📋 Important PDF Files Downloads
Join Whatsapp Channel