डिजिटल सातबारा आणि 8अ उतारा काढायचा कसा – How To Download Digital Signed 7/12 & 8A

(सूचना: डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ आणि प्रॉपर्टी कार्ड सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येईल.) Digital 7/12 & 8A

(Notice: Digitally signed 7/12, 8A and Property Card can be used for all official and legal purposes.)

डिजिटल स्वाक्षरीत सुधारीत सातबारा (Satbara) थेट शेतकऱ्यांच्या हाती पडावा यासाठीची मोहिम सुरु करण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही ही डिजिटल सातबारा काढायचा कसा याची माहिती शेतकऱ्यांनाही नाही. शिवाय ग्रामसेवक, तलाठी हे देखील यापासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे सातबाऱ्याचे महत्व आणि डिजिटल स्वाक्षरीत असलेला सातबारा काढायचा कसा याची माहिती आज आपण घेणार आहोत.

जमिनीची खरेदी-विक्री करताना जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक आहे. जसं की ती जमीन सध्या कोणाच्या नावे आहे? त्या जमिनीचा मूळ मालक कोण होता? जमिनीवर कोणते कर्ज घेतले आहे काय? वेळोवेळी त्यात कोणकोणते नवीन बदल होत गेले? यासंबधीची माहिती सातबारा, फेरफार बदल या रुपाने तहसील कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे. मात्र, काळाच्या ओघात शासनानेही यामध्ये बदल केले आहेत. आता घरबसल्याही तुम्ही सातबारा उतारा काढू शकणार आहोत.

असा बघा तुमचा CIBIL Score ? सिबिल स्कोर म्हणजे काय ?

सातबारा उतारा (7/12) म्हणजे काय ? Digital 7/12 & 8A

सातबाराचा उतारा हा जमिनीचा मुळ मालकी हक्क कोणाचा आहे हे दर्शवितो. याशिवाय जमीनधारकास स्वतःच्या नावे असलेली जमीनी किती आहे ? जमिनीचे सहहिस्सेदार कोण आहेत ? जमिन कोणती आहे ? जमिनीत फेरफार कधी झाले व कोणते ? ही माहिती सातबारा उतारा वरून मिळते.

ऑनलाईन सातबारा (7/12) उतारा कसा काढायचा ? Digital 7/12 & 8A

१. सर्वप्रथम https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या महाराष्ट्र महसूल विभागाच्या वेबसाईट जावं लागतं. ऑनलाईन सातबारा Digital Satbara Utara काढण्यासाठी वेबसाईटवर दोन पद्धती वापर केला जातो.

A). Regular Login                  B). OTP Login

Digital 7/12 A). Regular Login – जर तुम्ही आगोदरच यावर Login केले असेल तर तुम्हाला इथे नोंदणी करावी लागले. त्यात तुम्हाला OTP ची गरज लागत नाही. हा पर्याय जास्त सोईस्कर असतो.

Digital 7/12 B). OTP Login – यामध्ये तुमच्या मोबाईलवर एक OTP येतो. तो प्रत्येक वेळेस तुम्हाला सातबारा काढण्यासाठी टाकावा लागतो. जर तुम्ही आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.

  1. सातबारा काढण्याची तुमची पहिलीच वेळ असेल तर, ‘New User Registration’ इथे क्लिक करून, तुमची वैयक्तिक माहिती भरुन नोंदणी करायची आहे.

Digital 7/12 Portal वर नवीन नोंदणी साठी येथे क्लिक करा.

  1. यानंतर खाली ‘Please Check Availability of your Login Id’ इथे क्लिक करून यूजर नेम आणि पासवर्ड निवडायचा आहे. त्यानंतर ‘Submit’ वर क्लिक केल्यांनतर तुम्हाला ‘User Registration successful Click Here to Login म्हणून मेसेज दिसेल. म्हणजेच तुमची यशस्वीरित्या नोंदणी झाली आहे.

Digital 7/12 Portal वर लॉगीन करण्यासाठी येथे क्लिक करा.

  1. त्या मेसेजे वरील ‘Click Here to ‘Login’ यावर क्लीक करावं. यानंतर तुम्ही निवडलेला यूजरनेम, पासवर्ड आणि ‘Captcha'(कोड वर्ड) टाकून त्यात लॉगिन व्हावे.
  2. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यात तुमचा जिल्हा, तालुका, गाव टाकून सातबाराचा सर्वे नंबर/गट नंबर टाकून, अंकित सातबारा हा पर्याय निवडावा.
  3. Forgot Password Click Here 

Forgot Password करण्यासाठी येथे क्लिक करा.

Check Payment Status :- जर आपले ऑनलाईन पेमेंट बँकेकडून Successful झाले असेल पण या वेबसाईट वरील my balance मध्ये जमा झालेले दिसत नसेल तर ‘Check Payment Status’ या बटनावर क्लिक करावे व त्यासाठी आवश्यक असलेला PRN नंबर आपण लॉगिन करून Payment Status या option मधून त्या transaction साठी बघू शकता. Digital 7/12 & 8A

वरील  लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.

आमच्या सोशल मिडिया ग्रुप ला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

error: Content is protected !!