ठिबक सिंचन व तुषार सिंचन माहिती आणि नवीन नोदणी – MAHA DBT Thibak and Tushar Sinchan

MAHA DBT Thibak and Tushar Sinchan – ठिबक सिंचन व तुषार सिंचन माहिती  MAHA DBT Farmer Portal वर शेतकऱ्सायांसाठी महाराष्ट्र शासनांनी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जात आहे. त्यातील हि एक ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजना या योजनेंतर्गत शेतकर्यांना शेती करण्यसाठी लागणाऱ्या ठिबक सिंचन व तुषार सिंचन साठी महाराष्ट्र शासन अनुदान देतात व अर्ज कसा भरायचा त्याची माहिती पुढील प्रमाणे.

MAHA DBT Farmer ठिबक सिंचन म्हणजे काय

पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची आधुनिक पद्धत. या पद्धतीत, जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने अथवा सूक्ष्म धारेने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केले जाते.

MAHA DBT Farmer – ठिबक सिंचनाचे मुख्य फायदे

  • पाणी जमिनीला न देता डायरेक्ट पिकास दिले जाते.
  • शेतात वाफसा स्थिती कायम राहत असल्याने पिकाची वाढ जोरदार व सतत होते
  • पिकाला पिकाच्या गरजेनुसार लागेल तितके पाणी दिले जाते.
  • मुळाच्या कार्यक्षेत्रात पाणी, माती, हवा यांचा नेहमी समन्वय साधला जातो.
  • पाणी कमीत कमी वेगाने दिले जाते. त्यामुळे ते मुळाच्या आजू बाजूने जिरते. ठिबक सिंचनच्या सहाय्याने पिक उत्तम व दर्जेदार पीक उत्पादन मिळते.
  • ठिबक सिंचन हे ३० ते ८०% पाण्याची बचत करते.

MAHA DBT Farmer – ठिबक सिंचन साठी असा करा अर्ज

सर्वात आधी शेतकर्यांना MAHA DBT Farmer Portal वर स्वताची नोदणी करून युजर आयडी व पासवर्ड तयार करून घ्यावा. त्या नंतर MAHA DBT Farmer पोर्टल युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगीन करून घ्यावे. तुम्ही व्यक्तीक माहिती, शेतीची माहित व पिकाची माहिती भरून तुम्ही प्रोफाईल पूर्ण भरायची आहे. शेतकर्याची प्रोफाईल माहिती पूर्ण भरल्या नंतर तुमच्या समोर मुख्य पुष्ठ ओपेन होईल.

मुख पुष्ठ ओपेन झाल्यानंतर तुम्हाला अर्ज सरदार करा मध्ये सिंचन साधने व सुविधा हि बाब निवडायची आहे. (सिंचन साधने व सुविधा या घटकांतर्गत एकूण ७ बाबींना अर्थ सहाय्य देण्यात येत आहे. या पैकी आपल्या पसंतीची प्रत्येक बाब स्वतंत्रपणे निवडावी व त्याच्याशी संबंधित तपशील नमूद करावा आणि शेवटी आपण निवडलेल्या सर्व बाबींचा अर्जात समावेश करावा.)

MAHA DBT सिंचन साधने व सुविधा

  • तालुका –     तुम्हा तालुका निवडा (शेतीची माहिती)
  • गाव / शहर –     गाव शहर (शेतीची माहिती)
  • सर्वेक्षण क्रमांक / गट क्रमांक –     ज्या गटात तुम्हाला ठिबक सिंचन करायचे आहे तो गट निवडा.
  • मुख्य घटक –     मध्ये सिंचन साधणे आणि सुविधा निवडा
  • बाब –     मध्ये ठिबक सिंचन निवडा
  • उपघटक –     मध्ये इनलाईन प्रणालीऑनलाईन प्रणाली असे दोन उपघटक आहे, त्या पेकी तुम्हाला ज्या पद्धतीचे ठिबक सिंचन करायचे आहे, त्या नुसार एक उपघटक निवडा.
  • सन २००१ नंतर मला ३ रे अपत्य झालेले नाही – असल्यास होय करा किवा नसल्या नाही करा.

MAHA DBT सूक्ष्म-सिंचनासाठी पिके निवडा

तुम्हाला ज्या पिकासाठी ठिबक सिंचन करायचे आहे, ते पिक निवडा व त्या पिकाचे अंतर (मीटर मध्ये) निवडा आणि निवडलेल्या गटातील एकूण जमिनी पेकी तुम्हाला किती जमिनीवर ठिबक सिंचन करायचे आहे ते क्षेत्र (हेक्टर आणि आर) मध्ये टाका.

उदा. जसे कि कापूस या पिकासाठी अंतर 1.2 X  0.6 मी निवडावे व ठिबक साठी च क्षेत्र टाकावे (हेक्टर आणि आर) मध्ये.

वरील माहिती पूर्ण भरल्या नंतर मी पूर्व संमतीशिवाय सूक्ष्म सिंचन संच बसविल्यास अनुदानास पात्र असणार नाही, याची मला जाणीव आहे हा पर्याय वर टिक करून जतन करा या बटन वर क्लिक करा. जातर करा या बटन वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर एक नवी विंडो ओपेन होईल तयार घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडावयाचे आहेत का ? व तुम्हाला अजून काही घटक एड करायचे असेल तर Yes बटन वर क्लिक करा अन्यथा No बटन वर क्लिक करा.

ठिबक सिंचन चा फॉर्म कसा भरायचा बघण्यासाठी आमच्या YouTube वर व्हिडिओ बघा.

आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडून झाल्या नंतरचअर्ज सादर करा’ या बटनवर क्लिक करावे व खालील पद्धतीने Payment करावे.

MAHA DBT Farmer वर Payment भरण्याकरीता खालीलपैकी पर्यायाद्वारे Payment भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

  • वालेट-मोबाईल अप पेटीएम
  • नेट बँकींग
  • क्रेडीट कार्ड/डेबीट कार्ड
  • IMPS/NEFT
  •  UPI- Phone / Google Pay

MAHA DBT आवश्यक कागदपत्रे –

  • ७/१२ उतारा (मालकी हक्कासाठी)
  • ८ – अ उतारा (एकुणक्षेत्राच्या माहीतीसाठी )
  • शेतकऱ्याचे हमीपत्र (विहीत नमुना सोबत परिशिष्ठ ७ मध्ये सहपत्रित केला आहे).

वर दिलेली माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.

आमच्या सोशल मिडिया ग्रुप ला जॉईन होण्या-साठी येथे क्लिक करा.

उदा.

1. सुक्ष्म सिंचन कधी सुरु झाले ?

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक) अंतर्गत केंद्र पुरस्‍कृत सूक्ष्‍म सिंचन योजना 2015-16 पासून राज्‍यामध्‍ये राबविण्‍यात येत असून सन 2017-18 मध्‍ये सदर योजना महाराष्ट्र राज्‍यातील एकूण सर्व 34 जिल्‍ह्यांमध्‍ये हि योजना MAHA DBT Portal वर राबविण्‍यात येत आहे.
 

2. सिंचनाच्या पद्धती किती व कोणत्या ?

शेती साठी पाण्याची बचत करण्यासाठी सिंचनाच्या नवीन, आधुनिक पद्धतींचा वापर होऊ लागला. या मध्ये पहिले ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन अश्या एकूण दोन पद्धती आहे.

3. महाराष्ट्रात ठिबक सिंचनाचा वापर प्रामुख्याने कोणत्या पिकांसाठी केला जातो का?

कापूस, डाळिंब, लिंबू, आंबा इ. फळ बाग व भुसार पिके व ओळीमध्ये घेण्यात येणा-या पिकांसाठी (जेव्हा दोन रोपांमधील व रोपांच्या दोन ओळीमधील अंतर कमी असते, नगदी पिके उदा. भाजीपाला पिके, ऊस, तूर इ.)

4. महाराष्ट्रातील मुख्य शेती कोणती आहे व पिके ?

भुईमूग, कापूस, ऊस, हळद आणि तंबाखू ही नगदी पिके आहेत व आंबा, द्राक्षे, केळी, संत्री, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि कडधान्ये ही महाराष्ट्रातील प्राथमिक अन्न पिके आहेत. 

5.महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणते पीक घेतले जाते ?
महाराष्तट्र राज्यात अनेक प्रकारचे पिके घेतली जातात, परंतु त्या पेकी सर्वात जास्त ऊस, कापूस आणि तांदूळ ज्याची खरीप हंगामात लागवड केली जाते, ती उच्च आर्थिक मूल्य असलेली प्रमुख पिके आहेत..
 
वर दिलेली माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.
 

आमच्या सोशल मिडिया ग्रुप ला जॉईन होण्या-साठी येथे क्लिक करा.

 

Leave a Comment

error: Content is protected !!